आंबी – आज सकाळी 12:06 वाजता, वाटेफळ शिवार परिसरातून रस्त्यावरून जाणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक MH 42 EU 9533 मध्ये गोवंशीय जातीची 4 गाई आणि 1 वासरू असे एकूण 5 जनावरे अत्यंत अमानुष परिस्थितीत वाहतूक करताना आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती, मनोज ज्ञानदेव साळवे, वय 45 वर्षे, रा. राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर, यांनी जनावरांना गाडीच्या हौदामध्ये अत्यंत दाटीवाटीने कोंबून ठेवले होते. जनावरांची सुरक्षा आणि कल्याण पूर्णपणे दुर्लक्षित करून त्यांना अमानुषपणे वाहतूक केली जात होती.
या घटनेची माहिती मिळाल्यावर आंबी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच, त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 325, 192(अ) आणि प्राण्यांचा छळ अधिनियम कलम 11(1) (ड) (ई) (एच), महा प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ),(1), 9 (ब), आणि महा पशु संरक्षण अधिनियम कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्राण्यांच्या क्रूरतेविरोधात आवाज उठवून अशा घटनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.