धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका धाडसी कारवाईत धाराशिव शहरातील विविध ठिकाणीून चोरी केलेल्या पाच मोटारसायकलीसह एका आरोपीला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीवरून कारवाई करत आरोपी सैफ इरफान यादगीर याला ताब्यात घेतले. हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी तालुक्यातील रहिवासी आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने 2023 ते 2024 दरम्यान धाराशिव शहर, ग्रामीण भाग आणि अंबाजोगाई येथून पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेल्या मोटारसायकलीची एकूण किंमत ₹1,34,000 आहे.
पथकाने तात्काळ नमुद मोटारसायकली जप्त करून आरोपीला अटक केली. त्याच्यावर धाराशिव शहर, ग्रामीण आणि अंबाजोगाई पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.