उमरगा – 27 जुलै 2024: उमरगा येथील महात्मा बसवेश्वर शाळेजवळील चिंचेच्या झाडाजवळ 24 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता संदीप दत्ता औटी (27 वर्षे) यांना विठ्ठल राजु खराते, मोहन गंगाराम जाधव (रा. कुंभरपट्टी) यांनी फोन करून मेसेज करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात औटी गंभीर जखमी झाले.
औटी यांच्या आजी भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून ढकलले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी औटी यांनी 27 जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 118(1), 117(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.