तुळजापूर – येथे एका 15 वर्षीय मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी जेव्हा घरी एकटी असायची तेव्हा गावातील एक इसम तिला गोड बोलून आणि खाण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेत असे. तिथे नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.
ही घटना 31 जुलै 2024 रोजी उघडकीस आली आणि पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(1), 376(2) (जे) (एम) (एन) सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 कलम 8, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पीडित मुलीचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.