नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे एका भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 11 ऑगस्ट 2024 रोजी घडली असून, एका बेफामपणे चालवलेल्या गॅस टँकरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
नागनाथ मंडलिक हे आपली पत्नी रंजना आणि मुलगी वैष्णवी यांच्यासह मोटारसायकलवरून प्रवास करत होते. इटकळ बसस्थानकाजवळ एका गॅस टँकरने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रंजना मंडलिक यांचा जागीच मृत्यू झाला तर वैष्णवी गंभीर जखमी झाली. अपघात घडवून टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी नागनाथ मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात टँकरचालक राकेश भारत पाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.