• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव लाइव्हचा नवा लूक …

admin by admin
October 13, 2023
in सडेतोड
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा नवा लूक …
0
SHARES
292
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

जे नवं, ते आम्हाला हवं ! असं धाराशिव लाइव्हचं धोरण आहे. त्यामुळेच धाराशिव लाइव्हने पुन्हा एकदा आपल्या वेबसाईटचा लूक चेंज केला आहे. नवीन लूक युझर फ्रेंडली आहे. सध्याच्या स्मार्ट फोनच्या युगात मोबाईलवर वेबसाईट जलद गतीने हाताळता यावी, म्हणून हा बदल करण्यात आला आहे. नवा लूक आमच्या वाचकांना नक्कीच पसंद पडेल, अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाडयात धाराशिव जिल्हा सर्वात मागास. या मागास जिल्ह्यातून १२ वर्षापूर्वी म्हणजे सन २०११ मध्ये उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट सुरु केली. त्यावेळी इंटरनेटची 2G स्पीड होती आणि स्मार्ट फोन नव्हता. त्यामुळे वाचकांची संख्या मर्यदित होती. त्यानंतर 3G आला आणि वाचकांच्या संख्येत पाचपट वाढ झाली. पाच वर्षापूर्वी जसे 4G चे आगमन झाले आणि अत्याधुनिक स्मार्ट फोन आल्यामुळे मीडियात मोठा बदल झाला आहे. प्रिंट, टीव्ही मीडिया पाठोपाठ आता डिजिटल मीडिया उदयास आला आहे. छापील वृत्तपत्राची जागा ईपेपरने घेतली आहे. टीव्ही चॅनल्स मोबाईलवर पाहता येऊ लागले आहेत. डिजिटल मीडियाचे प्लँटफॉर्म (वेबसाईट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल,सोशल मीडिया ) ला सर्वाधिक पसंती आहे.

वाचकांना आजची बातमी आज नव्हे आताच हवी आहे. बातमी टेस्टबरोबर, फोटो, व्हिडीओमध्ये हवी आहे. फेसबुक, युट्युब लाइव्हमुळे वाचकांना लाइव्ह बातम्या पाहता येऊ लागल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर धाराशिव लाइव्हने स्वतःला बदलेले आहे. धाराशिव लाइव्हची आजमितीस वेबसाइट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल आणि सोशल मीडियाचे सर्व पेजेस आहेत.

धाराशिव लाइव्ह वेबसाईटला दिवसाला किमान ५ लाख वाचक भेट देतात. ३५ हजार वाचकांनी अँप डाऊनलोड केला आहे. युट्युब चॅनल्सचे ७६ हजार १०० सब्सक्राइब आहेत. फेसबुक पेजचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. सर्व प्लँटफॉर्मवरून दिवसाला किमान दहा लाख वाचक धाराशिव लाइव्हने मिळवले आहेत.

डिजिटल मीडियात धाराशिव लाइव्ह हे धाराशिव जिल्ह्यात नंबर १ आहे. हे केवळ वाचकांच्या बळावर शक्य झाले आहे. निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड हा धाराशिव लाइव्हचा बाणा आहे. येथे कोणतीही बातमी दाबली जात नाही. धाराशिव लाइव्हने आजपर्यंत कोणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही .आमचे डिजिटल चॅनल कोणत्याही नेत्याचे मुखपत्र नाही. वाचक हाच आमचा मालक आहे. वाचकांशी कधीच गद्दारी आम्ही करणार नाही. दर दोन – तीन वर्षाला धाराशिव लाइव्हने लूक चेंज केला आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपला लूक चेंज करून अधिक वेगवान आणि जलद केला आहे. डिजिटल मीडियात सर्वात अग्रेसर असलेले धाराशिव लाइव्ह बदलत्या काळाबरोबर नक्कीच बदल करीत राहील.

एकीकडे पत्रकारितेवरील लोकांचा विश्वास उडत चाललेला असला तरी, धाराशिव लाइव्हने धाराशिव जिल्ह्यात पत्रकारिता जिवंत ठेवली आहे. धाराशिव लाइव्हवर सर्वात अगोदर बातमी तर प्रसिद्ध होतेच, पण ती सत्य असते. आम्ही अनेक प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. तसेच अनेक प्रकरणाचा पाठपुरावा करून वाचकांना न्याय मिळवून दिला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांना मदत देखील केलेली आहे.

उस्मानाबाद लाइव्ह ते धाराशिव लाइव्ह

१६ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्र सरकारने उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली. त्यावेळी फक्त शहराचं नाव बदलण्यात आलं होतं . या नामांतराला हरकत घेणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. तेव्हा आम्ही ‘उस्मानाबाद लाइव्ह’ चा लोगो बदलून ‘धाराशिव लाइव्ह’चा लोगो वापरण्यास सुरुवात केली होती.

फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलचे नाव धाराशिव लाइव्ह केले. बातम्यात उस्मानाबाद ऐवजी धाराशिव शब्द वापरण्यास सुरुवात केली होती. तेव्हा नामांतराला विरोध करणारे आम्हाला ट्रोल करू लागले. काहीही कमेंट बॉक्समध्ये शिवीगाळ केली. तरीही लोकभावना लक्षात ठेवून आम्ही वेबसाइटला धाराशिव लाइव्ह लोगो कायम ठेवला, फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलचे नाव धाराशिव लाइव्ह कायम ठेवले होते.

१६ सप्टेंबर २०२३ रोजी तालुका, जिल्हा यांचे देखील नामांतर धाराशिव करण्यात आले. उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना राजपत्रमध्ये प्रसिद्ध होताच https://osmanabadlive.com/ डोमेन बंद करून http://dharashivlive.com करण्याचा निर्णय आम्ही घेतला. डोमेन बदलणे सहजासहजी शक्य नाही. सन २०११ पासून उस्मानाबाद लाइव्ह https://osmanabadlive.com वेबसाईट सुरु आहे . जुन्या बातम्यांचे url बदलल्यामुळे 404 error येणार आहे. तरीही आम्ही डोमेन बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गुगलच्या जाहिराती काही काळ बंद होणार आहेत. अखेर http://dharashivlive.com/ ही वेबसाइट नव्या रंगात आणि नव्या ढंगात सुरु करण्यात आली आहे. आपल्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागतच आहे. तेव्हा वाचत राहा, धाराशिव लाइव्ह…

– सुनील ढेपे
संपादक , धाराशिव लाइव्ह

Home

Previous Post

नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी मंदिर २२ तास राहणार खुले

Next Post

अजित दादांचा हट्ट

Next Post
अजित दादांचा हट्ट

अजित दादांचा हट्ट

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group