• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ठाकरे सरकारला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले

तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही - आ. राणा जगजितसिंह पाटील

admin by admin
November 15, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
ठाकरे सरकारला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

जळकोट – धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले आहे. केवळ तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक निर्णय यापूर्वीच महायुतीने सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आता तालुक्याचा आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्‍याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय 23 वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतला. महायुती सरकारने त्यासाठी आता 11 हजार 700 कोटी रूपयांची मान्यता दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात भर पडणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सुरू केलेले हे काम आपण मोठ्या जबाबदारीने पूर्णत्वाकडे आणले असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पहिली बसवसृष्टी नळदुर्ग येथे आपण साकारत आहोत. त्यासाठी पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. पाच कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठीही अडीच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नळदुर्ग येथे शादीखाना उभारण्यासाठी दोन कोटी उपलब्ध झाले असून या कामाचे भूमिपूजनही पूर्ण झाले आहे. जळकोट येथील बाबनवली दर्ग्यासाठी 10 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुळजापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी 50 कोटी रूपयांचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रूपयांची कामे सुरू केली आहेत. त्यातून मंदिराचा जीर्णोध्दार आणि मुख्य महाद्वारासह शहरात भव्य कमानी साकारल्या जाणार आहेत.

अनेक महत्वपूर्ण प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. काही प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित योजना आणि प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि सोबतीची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत आपल्याला काय मिळाले, याचा सर्वांनी विचार करावा. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात धाराशिव जिल्हा आणि आपल्या मतदारसंघात काय केले, याचा कार्य अहवाल आपल्या सर्वांसमोर मांडला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी नंदगाव येथील 40 पेक्षा अधिक जणांनी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जळकोटसह हंगरगा, बोरगाव, लोहगाव, मुर्टा, होर्टी, किलज, सलगरा यासह तांडे आणि वाड्या-वस्त्यावरील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

66 कोटींचा मावेजा मंजूर केल्याबद्दल गडकरींचे धन्यवाद

ज्यांची जमीन नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या रूंदीकरणासाठी संपादीत केली आहे, त्या शेतकरी कुटुंबीयांचे नुकसान होऊ नये या उदात्त भावनेने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 66 कोटी रूपयांचा मावेजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मार्गावरील शेतकरी बांधवांसाठी मोठ्या तळमळीने गडकरी साहेबांनी घेतलेल्या या क्रांतीकारी निर्णयाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 

Previous Post

निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा; नोडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

परंडा तालुक्यात अज्ञात महिलेचा खून, मृतदेह हरण ओढ्यात फेकला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

परंडा तालुक्यात अज्ञात महिलेचा खून, मृतदेह हरण ओढ्यात फेकला

ताज्या बातम्या

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

September 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

September 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला

September 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

September 2, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

September 1, 2026

Recent Posts

  •  ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?
  • येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
  • पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला
  • पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
  • तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!