धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील एकूण १४ लाख ४ हजार १५ मतदारांपैकी ९ लाख २१ हजार २८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाचा सरासरी टक्का ६५.६१% इतका आहे.
निकाल उद्या जाहीर होणार
निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे. मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
धाराशिव मतदारसंघ:
धाराशिव मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये होणार आहे. येथे १४ टेबल ठेवण्यात आले असून, मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत.
तुळजापूर मतदारसंघ:
तुळजापूर मतदारसंघातील मतमोजणी श्री तुळजाभवानी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये होणार आहे. येथेही १४ टेबल असून, मतमोजणी ३० फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
परंडा मतदारसंघ:
परंडा मतदारसंघातील मतमोजणी भूम येथील शासकीय निवासी शाळेत होणार आहे. येथे १४ टेबल असून, २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.
उमरगा मतदारसंघ:
उमरगा मतदारसंघाची मतमोजणी पंचायत समिती हॉलमध्ये होणार आहे. येथेही १४ टेबल असून, मतमोजणीची २३ फेऱ्या होतील.
नजर सर्वांच्या निकालाकडे:
चारही मतदारसंघांतील उमेदवारांसाठी हा निकाल निर्णायक ठरणार आहे. कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्याच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशिव लाइव्हचा निवडणूक अंदाज:
मतदानाच्या निकालांवर आधारित काही निवडणूक अंदाज वर्तवले जात आहेत. धाराशिव लाइव्हने दिलेल्या अंदाजानुसार, मतदारसंघवार परिस्थिती अशी आहे:
- धाराशिव: विद्यमान आमदार कैलास पाटील विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकल्याचे दिसून येते.
- तुळजापूर: विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
- परंडा: विद्यमान आमदार तानाजी सावंत डेंजर झोनमध्ये असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.
- उमरगा: विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांची स्थिती देखील डेंजर झोनमध्ये असल्याचे संकेत मिळत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात विधानसभा मतमोजणी अनुषंगाने लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त
दिनांक 23.11.2024 रोजी धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ उमरगा- 240, तुळजापूर-241, उस्मानाबाद- 242 व परंडा-243 मतमोजणी असल्याने मतमोजणी शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्याकरीता, कोणतीही अप्रिय घटना घडु नये,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निमार्ण होवू नये याकरीता जिल्ह्यामध्ये बंदोबस्तकामी 05 पोलीस उप अधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 100 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 1,494 पोलीस अमंलदार व 1,442 होमगार्ड तसेच निम्नलष्करी दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 4 मतदार संघात लावण्यात आलेला बंदोबस्त खालील प्रमाणे
उमरगा- येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 03 पोलीस निरीक्षक, 17 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 332 पोलीस अमंलदार व 305 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
तुळजापूर- येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 04 पोलीस निरीक्षक, 23 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 373 पोलीस अमंलदार व 384 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
उस्मानाबाद- येथे 02 पोलीस उप अधीक्षक, 06 पोलीस निरीक्षक, 30 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 401 पोलीस अमंलदार व 386 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
परंडा- येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 04 पोलीस निरीक्षक, 30 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 388 पोलीस अमंलदार व 367 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
मतमोजणी ठिकाणी कोणीही मोबाईल फोन/ईलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नये.