धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन मोटरसायकल चोरीच्या घटना २४ तासांत घडल्या आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे – एमआयडीसी धाराशिव येथील रहिवासी मदन रामराव पवार यांची २० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच २५ एए ९४५९) २६ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेली. तसेच समर्थ नगर येथील रहिवासी आण्णासाहेब अशोक काकडे यांची २० हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच २५ एएच ३१०६) ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान करंजकर हॉस्पिटल समोरून चोरीला गेली.
उमरगा पोलीस ठाणे – गुंजोटी येथील रहिवासी रामेश्वर राजेंद्र कुंभार यांची ४० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच २५ एटी ९६७४) २६ डिसेंबर रोजी रात्री १० ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली.
या तिन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.