नळदुर्ग: मागील भांडणाचे कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेसह तिघांना मारहाण करून जखमी केल्याची घटना वडाचा तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमनबाई किसन राठोड (वय ७५ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, प्रेमदास उमा राठोड, अर्जुन नामदेव राठोड, नामदेव उमा राठोड, अजय उर्फ बबन प्रेमदास राठोड यांनी त्यांना, त्यांचे पती किसन लिंबा राठोड आणि नातु श्रीनिवास गोविंद राठोड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड आणि बेल्टने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना ४ जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी सुमनबाई राठोड यांनी ५ जानेवारी रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कडोदरा येथे शेत रस्त्याच्या वादातून तिघांना मारहाण
मुरुम: शेत रस्त्याच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण करून जखमी केल्याची घटना कडोदरा येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गोविंद हत्तरगे (वय ३२ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, प्रभाकर बळीराम हत्तरगे, ज्ञानेश्वर व्यंकट हत्तरगे, विष्णु प्रभाकर हत्तरगे, व्यंकट बळीराम हत्तरगे, मोनिका विष्णु हत्तरगे, गोजर व्यंकट हत्तरगे यांनी त्यांना, त्यांची आई रुक्मीनीबाई आणि आत्या शारदाबाई काळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कडोदरा शिवारातील शेत गट १८४ मधील सामाईक बांधालगत घडली. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सचिन हत्तरगे यांनी ५ जानेवारी रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ईट येथे तरुणाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
वाशी: मागील भांडणाचे कारणावरून एका ३३ वर्षीय तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना ईट येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज सुभाष वेदपाठक (वय ३३ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, अगंद किसन वेदपाठक आणि विजय अंगद वेदपाठक यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि दगडाने मारहाण केली. तसेच फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आणि ५ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४.५३ वाजता ईट येथील सोन्याच्या दुकानासमोर घडली.
याप्रकरणी सुरज वेदपाठक यांनी ५ जानेवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.