नळदुर्ग :आरेापी नामे- 1) सरदार चॉद शेख, 2)असिफ सरदार शेख, 3) अब्बास सरदार शेख, 4) सद्दाम सरदार शेख, सर्व रा. देवसिंगा नळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.10.2023 रोजी 12.00 देवसिंगा नळ शेत शिवार येथे फिर्यादी नामे- सैफन बंदेअली शेख, वय 60 वर्षे, रा. देवसिंगा नळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना बांध टोकरण्याचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खोऱ्याच्या दांड्याने, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. व हात पाय तोडण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सैफन शेख यांनी दि.26.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरेापी नामे- 1)अंकुश विश्वनाथ गोफने, 2) अमोल अुंकुश गोफने, 3)अनिल जगन्नाथ गोफने, 4) दिपाली अनिल गोफने, सर्व रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.25.10.2023 रोजी 16.00 वा. सु. सर्वे नं 60 मध्ये भोत्रा येथे फिर्यादी नामे- आबासाहेब मुरलीधर गोफने, वय 41 वर्षे, रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांना जमीन मोजणीचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आबासाहेब गोफने यांनी दि.26.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरेापी नामे-1) गुड्डू कुबेर सय्यद, 2) शोयब मुजफर सय्यद, 3)मुन्ना जावेद सय्यद,4) जुनेद मुजफर सय्यद सर्व रा. मोहा, ता कळंब जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 10.00 ते 10.30 वा. सु. मोहा शिवारातील खुद्दुस सय्यद यांचे शेतात व महाराष्ट्र ग्रामीण बॅकेसमोर मोहा येथे फिर्यादी नामे- आरबाज कचरु पठाण, वय 21 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांना सोयाबीनचे भुसकटाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी आरबाज पठाण यांनी दि.26.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम :आरेापी नामे-1)राजु कमलाकर सुरवसे,3) शालुबाई कमलाकर सुरवसे, सर्व रा. कडोदरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 12.30 वा. सु. कडदोरा येथे देवी मंदीराजवळ फिर्यादी नामे- विक्रम तानाजी भालेराव, वय 26 वर्षे, रा. कडदोरा, ता. उमरगा जि. धाराशिव हे नमुद आरोपीच्या लहान मुलास रस्त्याचे बाजूला खेळा असे सागिंतले असता नमुद आरोपीतांनी फिर्यादीस रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वेळूच्या काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी विक्रम भालेराव यांनी दि.26.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघातात एक ठार
धाराशिव : दि. 26.05.2023 रोजी 08.30 पुर्वी एन एच 52 रोडवर अजमेरा कंन्स्ट्रक्शन गेटच्या समोर धाराशिव येथे मयत नामे- अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्षे यास अज्ञाज वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अनोळखी इसमास धडक दिली. या आपघातात आनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्षे हे गंभीर जखमी होवून मयत झाला. नमुद अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी पोलीस हावलदार/ 379 जयप्रकाश प्रभाकर गलांडे नेमणुक- धाराशिव शहर पोलीस ठाणे यांनी दि.26.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.