• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा

आमदार कैलास पाटील यांची राज्यपालांकडे केली मागणी

admin by admin
October 28, 2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
उर्जा विभागाने तुघलकी निर्णय घेऊ नये – आ. कैलास पाटील
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यानी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२३ पासुन आंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे १७ दिवस बेमुदत उपोषणास बसले होते. त्यावेळी सरकारच्यावतीने एक महिन्यामध्ये मराठा आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. श्री. जरांगे यानी महिन्याऐवजी 40 दिवसाची मुदत दिली ती २४ ऑक्टोबरला संपली आहे. राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासुन पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सूरु केले आहे.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलने चालु असुन त्याची धग गावखेड्यासह शहरामध्ये दिसत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही व वैद्यकीय उपचारही घेणार नाही अशी कठोर भुमिका श्री. जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना तीव्र झाली आहे, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन मराठा तरुण आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलताना दिसत आहेत.

अद्यापपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही अथवा याबाबत माहितीही दिलेली नाही. आरक्षण कसे देणार याबाबत ठोस भुमिकाही मांडलेली नसल्याने समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशा काळात मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणे आवश्यक असुन समाजाला सरसकट आरक्षण देण्याबाबत तात्काळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यानी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

Previous Post

मराठा आरक्षण : न्या. शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

Next Post

पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

Next Post
उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार - आ. राणाजगजितसिंह पाटील

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली

October 22, 2026
तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

October 22, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

October 22, 2026

Recent Posts

  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर
  • नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला
  • कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
  • मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!