धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरी रॅकेटचा मुख्य आरोपी गट शिक्षणाधिकारी मॅडमचा दिवटा चिरंजीव याने धाराशिव लाइव्हमध्ये फसवणुकीच्या बातम्या प्रकाशित होताच मोठ्या साहेबासोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत काढलेले फोटो, व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट करण्याचा गडबडीने सपाटा लावला आहे!
सोशल मीडियाचा वापर – “बडी लोकल, बडा धंदा!”
- मोठ्या साहेबाशी किती जवळीक आहे, हे दाखवण्यासाठी हा आरोपी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि रील्स टाकत होता.
- या चमकत्या पोस्ट पाहून तरुण भाळले आणि मोठ्या साहेबाच्या ओळखीमुळे नोकरी नक्की लागेल या भ्रमात पैसे भरले.
- पण फसवणुकीचा पर्दाफाश होताच त्याने तातडीने हे फोटो-व्हिडीओ गायब केले!
सत्य बाहेर आलं, म्हणून घाबरला?
- जर काही गैर केलं नाही, तर फोटो-व्हिडीओ डिलीट करण्याची इतकी घाई का?
- मोठ्या साहेबांची जवळीक दाखवणारा हा मास्टरमाइंड आता पोलीस चौकशीच्या भीतीने पुरावे मिटवत आहे का?
तरुणांना न्याय मिळणार का?
- नळदुर्ग पोलीस अजूनही गुन्हा दाखल करण्यासाठी तपास सुरू आहे म्हणताहेत.
- मुख्य आरोपी पुरावे नष्ट करत असताना पोलीस गप्प का?
फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
आता प्रश्न – मोठ्या साहेबांचा वरदहस्त कधी हटणार?
मुख्य सूत्रधाराने फोटो डिलीट करून आपली ओळख पुसण्याचा प्रयत्न केला, पण सत्य लपणार नाही!
फसवणुकीच्या बळी ठरलेल्या तरुणांना न्याय मिळणार की हा गुन्हा “तपास सुरू आहे” च्या फाईलमध्येच अडकणार?
या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!