• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अतिक्रमण कायम, नाल्या गायब आणि निकृष्ट कामाची शक्यता

 – अणदूरच्या रस्त्याचे भविष्य धूसर!

admin by admin
February 4, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
अणदूरच्या खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता होणार सिमेंटचा
0
SHARES
327
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर (ता. तुळजापूर) – श्री खंडोबाच्या पवित्र नगरीत विकासाच्या नावाखाली रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू होणार असले, तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १ कोटी ३६ लाख रुपये खर्च करून ४०० मीटरचा रस्ता तयार होणार असला, तरी अतिक्रमण हटवण्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरळ डोळेझाक केली जात आहे.

अतिक्रमण हटवायचेच नाही?

बसस्थानक ते आण्णा चौक या मार्गावर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. काहींनी तर सरकारी रुग्णालयासमोर पक्के बांधकाम करून सार्वजनिक रस्त्यालाच ग्रासले आहे. पत्र्याचे शेड टाकून अडथळा निर्माण करणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखण्याचे धाडस दाखवलेले नाही. अतिक्रमण कायम ठेवूनच काँक्रीटचा रस्ता तयार केला जात आहे, म्हणजे भविष्यात हा प्रश्न आणखीनच गंभीर होणार!

नाल्या नाहीत, पाणी कुठे जाणार?

सर्वसामान्य नियम असा की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे केली जातात. मात्र, अणदूरमध्ये हा मुद्दा सर्रास डावलला जात आहे. पावसाळ्यात पाणी निघणार कुठे? साचलेले पाणी रस्त्यावरच राहिल, आणि दोनच वर्षांत नवा रस्ता उखडण्याचा धोका निर्माण होईल.

“निकृष्ट कामासाठी प्रसिद्ध असलेला गुत्तेदार”

या कामाचा ठेका भाजपशी संबंधित एका गुत्तेदाराने घेतला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, हा ठेकेदार निकृष्ट काम करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या हातून झालेले अनेक प्रकल्प गुणवत्तेच्या अभावामुळे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे अणदूरचाही रस्ता हा एक मोठा भ्रष्टाचाराचा नमुना ठरणार का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

राजकारण आणि विकास – दोन्हीचा खेळखंडोबा!

अणदूर हे मोठे तीर्थक्षेत्र असून, महाराष्ट्र-कर्नाटकातून लाखो भाविक येथे येतात. विकासाची गंगा वाहायला हवी, मात्र ती राजकीय हस्तक्षेपाने गढूळ होत आहे. अतिक्रमण काढण्याऐवजी त्यावरच रस्ता टाकला जाणार, नाल्या करायच्या नाहीत, आणि वर निकृष्ट काम होणार! हे सगळे नंतर कोण भोगणार? अर्थातच स्थानिक नागरिक आणि दर्शनाला येणारे भाविक!

ग्रामस्थांनी या प्रकल्पावर लक्ष ठेवावे आणि दर्जेदार कामासाठी प्रशासनावर दबाव टाकावा, अशी स्थानिक स्तरावर जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, हा रस्ता झाल्यावरही “संपला तरी सुरूच!” अशी अवस्था होईल!

Previous Post

लाखोंची फसवणूक, जादूटोना आणि धमकीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल!

Next Post

अणदूर – अतिक्रमण हटवण्याचे आदेश, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी?

Next Post
अणदूरच्या खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता होणार सिमेंटचा

अणदूर - अतिक्रमण हटवण्याचे आदेश, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी?

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात वृद्धेवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला; जुन्या भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण, एकावर गुन्हा दाखल

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात गुंडांचा थरार! तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; पीव्हीसी पाईप कारखाना पेटवून लावले लाखोंचे नुकसान

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group