धाराशिव : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका वाईन शॉपमध्ये खंडणीसाठी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी संजय अडवाणी (वय 51) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी संदीप बनसोडे आणि त्याच्या 12 साथीदारांनी 5 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता त्यांच्या वाईन शॉपमध्ये घुसून पैसे न देता बिअर घेतली. अडवाणी यांनी पैसे मागितले असता, आरोपींनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच, दुकान चालवण्यासाठी 5 हजार रुपयांची खंडणी मागितली आणि शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर संजय अडवाणी यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 308 (2), 115 (2), 352, 351 (2) (3) आणि 189 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.