तुळजापूरमध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून संगीता गोळे हिला ताब्यात घेऊन तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
आतापर्यंत चार आरोपी अटकेत:
- संगीता गोळे (मुंबई) – ३ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
पोलिसांच्या हाताला लागलेला मुद्देमाल:
- 45 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज – किंमत ₹2,15,000
- गुन्ह्यात वापरलेली मोटार कार (MH 25 R 5598) – ₹7,50,000
- चार स्मार्टफोन – ₹1,72,000
गेल्या काही वर्षापासून मुंबईहून एमडी ड्रग्ज तुळजापुरात आणून ते एक ग्रॅम ३ हजार रुपयास विकले जात होते त्यात जवळपास दीड हजार तरुण जाळ्यात अडकले होते. याप्रकरणी श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी आणि काही जागरूक नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर आता कुठे कारवाई सुरु झाली आहे.
पोलीस आता कुणावर धाड टाकणार?
संगीता गोळेच्या अटकेमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा नेटवर्क केवळ धाराशिव आणि तुळजापूरपुरता मर्यादित नसून, थेट मुंबईपर्यंत पसरलेला आहे.
➡ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अजून किती मोठी नावे बाहेर पडणार? पोलीस मुळापर्यंत हात घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.