उमरगा: उमरगा शहरात एकाच दिवशी दोघांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक भागवत व्हनाळे (वय ३८) आणि हॉटेल व्यावसायिक आनंद रत्नाकर जेवळे-पाटील यांनी दहा तासांच्या अंतराने आत्महत्या केली.
भागवत व्हनाळे यांनी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवाची बाब म्हणजे व्हनाळे यांचा मृतदेह खाली उतरवणाऱ्यांमध्ये आनंद जेवळे-पाटील यांचा समावेश होता आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गळफास घेऊन जीवन संपवले.
प्राध्यापक भागवत व्हनाळे हे महाविद्यालयात चांगल्या पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी शिक्षिका आहे आणि त्यांना शेतीही आहे. तरीही त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आर्थिक व्यवहार, दबाव किंवा इतर काही त्रास होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.