भूम – तालुक्यातील वाल्हा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनांमध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींनी एकमेकांवर प्राणघातक हल्ल्याचे आरोप करत फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना 15 मार्च रोजी सकाळी 9.15 वाजता घडली. फिर्यादी रत्नदिप शिवाजी चव्हाण (वय 38, रा. वाल्हा, ता. भुम) हे जिल्हा परिषद शाळेजवळून जात असताना निलेश अर्जुन शेळवणे, बालाजी संजय शेळवणे, जयसिंग ज्ञानराज चौघुले, राम नानासाहेब पवार, राहुल नारायण शेळवणे, अतुल नारायण शेळवणे, संस्कार उर्फ पांडुरंग गपाट आणि बालाजी जयराम शेळवणे (सर्व रा. वाल्हा) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या गटाने रत्नदिप चव्हाण यांना गळा दाबून, शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि वायरने मारहाण केली. त्यांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. रत्नदिप चव्हाण यांनी 18 मार्च रोजी फिर्याद दिली, त्यावरून भुम पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 109, 118(1), 115, 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. फिर्यादी शरद बाबासाहेब शेळवणे (वय 32, रा. वाल्हा, ता. भुम) यांच्यावर आरोपी रत्नदिप चव्हाण, पवन चव्हाण, अतुल चव्हाण, भाऊ चव्हाण, उमेश शिंदे आणि अंकुश मेंढे (सर्व रा. वाल्हा) यांनी झडप घालून मारहाण केली. एका वादातून या आरोपींनी शरद शेळवणे यांना गळा दाबून, शिवीगाळ करत लोखंडी गज आणि काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शरद शेळवणे यांनी 18 मार्च रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भा.दं.वि. कलम 109, 118(1), 115, 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे वाल्हा गावात तणावपूर्ण वातावरण असून, पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.