• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“फोटो काढायला आलात का?”; पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना थेट सवाल!

स्थानिक आमदाराकडूनही तोंडावर बोळा, पदाधिकाऱ्यांकडून असंवेदनशीलतेचा कळस

admin by admin
September 24, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
“फोटो काढायला आलात का?”; पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना थेट सवाल!
0
SHARES
998
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : घरात पाणी, तोंडात कोरड आणि मनात संतापाचा आगडोंब! अशा स्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा करणाऱ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा संताप आज अनावर झाला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना वाघेगव्हाण येथील संतप्त तरुणांनी आणि ग्रामस्थांनी “फोटो काढायला आलात का? आधी आमचं नुकसान बघा!” अशा शब्दांत रोखठोक जाब विचारला. गावकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देत स्थानिक भाजप आमदार राणा पाटील यांनी “लक्ष नका देऊ, मघाचा तोच आहे,” असे म्हणत प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे एका भाजप पदाधिकाऱ्याने “बिसलरीचा बॉक्स मी देतो” असे म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

धाराशिव जिल्ह्यातील वाघेगव्हाण येथे पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. शेती आणि घरादारांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत मंत्री गिरीश महाजन पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. “साहेब, आधी आमच्या घरात शिरलेलं पाणी बघा, आमचं काय नुकसान झालंय ते तर नीट पाहा,” अशा शब्दांत एका तरुणाने आपला संताप व्यक्त केला.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही, दोन वेळच्या जेवणाचे हाल आहेत, अशी गंभीर परिस्थिती मांडत गावकऱ्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. “तुम्हाला प्यायला पाणी किंवा जेवण लागलं तर इथे काहीही सोय नाही,” या शब्दांत त्यांनी दाहक वास्तव मंत्र्यांपुढे ठेवले. शासनाचे मदतीचे जुने निकष बदलून शेतकऱ्यांना सन्मानजनक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.

एकीकडे गावकरी आपल्या व्यथा मांडत असताना, मंत्री महाजन यांनी “शेतकऱ्यास कशासाठी बोलतो हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी स्थानिक आमदार राणा पाटील यांनी मंत्री महाजन यांना “लक्ष नका देऊ, मघाचा तोच आहे,” असे सांगत गावकऱ्याच्या संतापाला केराची टोपली दाखवली. यानंतर मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी गावकऱ्यांना पुढे येऊन बोलण्यापासून अडवल्याने तणाव अधिकच वाढला.

या सर्व गंभीर परिस्थितीत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला. पाण्याची सोय करण्याच्या चर्चेवेळी ते अगदी सहजपणे म्हणाले, “हा तर फक्त पाच हजार रुपयांचा विषय आहे; १०० रुपयाला बिसलरीचा बॉक्स हवा तर बिल मी देतो.” त्यांच्या या बेजबाबदार आणि थट्टेखोर वक्तव्यामुळे पूरग्रस्तांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून, शासनाच्या एकूणच भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Previous Post

उमरग्यात पेट्रोल पंप मालकाला दीड लाखाच्या खंडणीसाठी मारहाण

Next Post

कळंबमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कळंबमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group