नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरळी खुर्द येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव प्रकाश देवबा गायकवाड (५४ वर्षे, रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आहे.
३० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आरळी खुर्द बसस्थानकाजवळील प्रवीण किरणा स्टोअर्स या दुकानात गायकवाड यांनी पान मसाला, विमल गुटखा आणि तंबाखू असा एकूण ४७,६०६ रुपये किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला होता. नळदुर्ग पोलिसांनी छापा टाकून हा गुटखा जप्त केला.
गायकवाड यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 123, 274, 275, 223सह अन्न सुरक्षा आणि मानके अधि 2006 कलम 59 अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.