वाशी: बँक ऑफ महाराष्ट्र, ईट शाखेत बनावट कागदपत्रांचा वापर करून मयत व्यक्तीच्या नावावरून 37,000 रुपये काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.10 वाजता राजेश उर्फ नवनाथ चव्हाण (वय 36, रा. रामवाडी, सोलापूर), राजेश भालचंद्र काळे (वय 36, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर), गंगाराम गोविंद चव्हाण (वय 55, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) आणि शकुंतला पुरुषोत्तम कसबे (वय 60, रा. रेल्वे लाईन, संगमेश्वर कॉलेजजवळ, चर्चच्या मागे, सोलापूर) यांनी बँकेत मयत व्यक्तीच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करून त्यांच्या नावावरील 37,000 रुपये काढले.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले किरण बाळासाहेब शेवाळे (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं.कलम 318,(4), 336(2), 336(3), 340(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.