बेंबळी : दि. 18.06.2024 रोजी 06.00 ते दि. 19.06.2024 रोजी 05.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने नितळी येथील आई देवी कालीका भवानी देवीच्या मंदीरातील देवीच्या अंगावरील अंदाजे 1, 47, 000₹ किंमतीचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भारत विठ्ठल गुरव, वय 70 वर्षे, पुजारी आई देवी कालीका भवानी मंदीर नितळी रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.24.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-दिपक गौतमी मगर, वय 27 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 07 ए.एफ 3272 ही दि. 23.06.2024 रोजी 02.00 वा. सु. वरुडा ब्रीज च्या बाजूला तिरुपती पार्क धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिपक मगर यांनी दि.24.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-हरीभाउ भुजंग गायकवाड, वय 50 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांच्या मोहा शिवारातील शेत गट नंबर 656 मधील गोठ्यात बांधलेल्या जाफराबादी एक म्हैस व मुऱ्हा जातीची एक म्हैस व एक गावरान जातीची कालवड ही दि. 17.06.2024 रोजी 20.00 ते दि. 18.06.2024 रोजी 05.00 वा. सु. आरोपी नामे- कड्या उर्फ शहाजी काळे रा. मोहा ता. जि. धाराशिव यांनी चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हरीभाउ गायकवाड यांनी दि.24.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.