भूम – शहरातील फ्लोरा चौक येथे हॉटेलमध्ये एका तरुणावर गॅंगने तलवार, बिअर बॉटल आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून भुम पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
13 मार्च रोजी संध्याकाळी 6.45 वाजता, फिर्यादी विशाल बाबासाहेब गरड (वय 24, रा. समर्थ नगर, परंडा रोड, भुम) हे फ्लोरा चौकातील एका हॉटेलमध्ये असताना सनी काळे, काका सावंत, अक्षय पाचकवडे, इम्रान शेख, शक्ती काळे आणि शरण काळे (सर्व रा. भुम, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्याचे कारण फिर्यादीने याआधी भुम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार अर्ज दिला होता, त्यामुळे आरोपी संतप्त होते. त्यांनी विशाल गरड यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर तलवार, बिअरच्या बाटल्या, कोयता आणि दगडांनी हल्ला करत गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी विशाल गरड यांनी 18 मार्च रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भा.दं.वि. कलम 109, 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 189(4), 191(3), 190, 125(अ) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी येथे किरकोळ कारणावरून मारहाण – चौघांविरोधात गुन्हा दाखल
वाशी – तालुक्यात गोजवाडा मार्गावर घोडकी चौकाजवळ एका व्यक्तीस किरकोळ वादातून चौघांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
13 मार्च रोजी रात्री 8 वाजता, फिर्यादी दत्तात्रय वसंत ओमन (वय 42, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) हे गोजवाडा मार्गाने घोडकी चौक, झिन्नर शिवार येथे जात असताना मधुकर देविदास जगताप, आकाश मधुकर जगताप, अभिजीत मधुकर जगताप आणि बाळु विक्रम जगताप (सर्व रा. वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी त्यांना गाडी चालवण्यावरून वाद घालत थांबवले.
यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच काठी आणि वायरने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी दत्तात्रय ओमन यांनी 18 मार्च रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भा.दं.वि. कलम 189(2), 191(2), 191(3), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.