• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम येथे जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉड, काठीने मारहाण

 तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
314
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – मागील भांडणाच्या कारणावरून तीन तरुणांनी एका ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच दगड, काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना भुम शहरात घडली आहे. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप वसंत गाढवे (वय ३५, रा. जिजाऊ चौक, भुम) हे दि. १९.०४.२०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भुम येथील इंदिरा वाईन शॉप समोर थांबले होते. यावेळी आरोपी नामे- विक्की उर्फ फक्कड जावळे, स्वप्नील उर्फ कद्या जानराव, सुमित गवळी (तिघे रा. भुम) यांनी संदीप गाढवे यांना मागील भांडणाचे कारणावरून अडवून शिवीगाळ केली.

शिवीगाळ केल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी दगड, काठी आणि लोखंडी रॉडनेही संदीप गाढवे यांना बेदम मारहाण केली, यात ते गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर, फिर्यादी संदीप गाढवे यांनी दि. २३.०४.२०२५ रोजी भुम पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून, भुम पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ फक्कड जावळे, स्वप्नील उर्फ कद्या जानराव, सुमित गवळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११५(२), ११८(२), ३(५) अन्वये गंभीर दुखापत करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास भुम पोलीस करत आहेत.

बावी फाट्यावर जुन्या वादातून एका कुटुंबातील तिघांना चौघांकडून मारहाण

भूम – मागील भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाच कुटुंबातील वडील, पत्नी आणि सूनेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बावी फाट्यावर घडली आहे. या घटनेत वडील जखमी झाले असून, भुम पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोवर्धन गोरख कांबळे (वय ४९, रा. बावी, ता. भुम) हे दि. २२.०४.२०२५ रोजी सकाळी ९ ते ९:४० च्या सुमारास बावी फाट्यावर होते. यावेळी आरोपी नामे- राहुल सुग्रीव कांबळे, सुजित भारत कांबळे, दत्ता सुग्रीव कांबळे, सुदाम पोपट कांबळे (सर्व रा. बावी) यांनी गोवर्धन कांबळे यांना मागील भांडणाच्या कारणावरून अडवून शिवीगाळ केली.

शिवीगाळ केल्यानंतर आरोपींनी गोवर्धन कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी, दगड, गज आणि काठीने मारहाण करून जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गोवर्धन यांची सून क्रांती आणि पत्नी पद्मिनी यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली.

या प्रकारानंतर गोवर्धन गोरख कांबळे यांनी दि. २३.०४.२०२५ रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून, आरोपी राहुल कांबळे, सुजित कांबळे, दत्ता कांबळे आणि सुदाम कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११५(२), ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भुम पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भाची असल्याचे भासवून ७९ वर्षीय वृद्धेची ७ हजार रुपयांची फसवणूक

Next Post

बेंबळी : बरमगाव येथे नालीच्या वादावरून तरुणाला मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

बेंबळी : बरमगाव येथे नालीच्या वादावरून तरुणाला मारहाण

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group