येरमाळा : गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १५ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.५० वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील तेरखेडा ब्रिजवर उघडकीस आली.
येरमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेजाफर यासीन सय्यद (वय २८, रा. इंदापूर, जि. पुणे) याने अशोक लिलँड कंपनीच्या टेम्पो (क्र. एमएच १२ एनएक्स ५२२५) मधून गोवंशीय जातीची एकूण ४३ वासरे निर्दयतेने वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनामध्ये वासरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. सदर वासरे बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५, ५(अ), (१) (२), ५(ब), प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३, ११(१)(डी)(एफ)(एच)(के) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.