परंडा : आरोपी नामे-चैतन्य पांडुरंग शेळके, सुजित पवार, निखील अमोल गोळे, किरण गोफणे व इतर दोन अनोळखी इसम यांनी दि. 22.06.2024 रोजी 12.00 वा. सु. तुषार पाटील यांचे शेतातील नदीपात्रातील विहीरीजवळ भोत्रा शिवारात फिर्यादी नामे- योगेश हनुमंत बुरंगे, वय 26 वर्षे, रा. मंगळवार पेठ, माळी गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे व त्यांचे मित्र कपिल आलबत्ते, शुभम कांबळे, शहाजी माळी हे फिर्यादीचे शेताकडे जात असताना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन मोटरसायकल आडवी लावून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने योगेश बुरंगे यांच्या कंबरेचे डावे बाजूस बंदुकीची गोळी मारुन गंभीर जखमी केले. व कपिल आलबत्ते यास बंदुकीच्या मागील बाजूने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- योगेश बुरंगे यांनी दि.22.06.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 307, 341, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे-सुरेश सिताप्पा माने, लक्ष्मण नागाप्पा कोळगे, तानाजी नामदेव माने, हरीदास नामदेव माने, अंजना लक्ष्मण कोळगे सर्व रा. कनगरा ता. जि. धाराशिव यांनी दि.21.06.2024 रोजी 20.00 वा. सु. कनगरा येथे फिर्यादी नामे- अमोल राजेंद्र जाधव, वय 32 वर्षे, रा.कनगरा ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील, अज्जी यांना सार्वजनिक रस्त्याने जाण्या येण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल जाधव यांनी दि.22.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 324, 323, 504, 143, 147 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.