• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 29, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

admin by admin
June 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
82
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – तालुक्यातील खानापूर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश आण्णासाहेब झांबरे (वय ३६, रा. खानापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. झांबरे कुटुंबीय गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान कामानिमित्त घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.

घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेले ९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी घरी परतल्यानंतर अविनाश झांबरे यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाट तपासले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर अविनाश झांबरे यांनी शनिवारी, २८ जून रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३०५(ए), आणि ३(५) अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

June 29, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव शहरात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई, ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 29, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

June 29, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुजरातला जाणारा तांदूळ परस्पर विकला, तिघांवर गुन्हा दाखल

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group