बेंबळी : फिर्यादी नामे- अमरसिंह विजयकुमार साळुंके पाटील, वय 27 वर्षे, सोबत वडील-विजयकुमार साळुंके, आई सविता साळुंके तिघे रा. आजनी खुर्द ता. अहमदपुर जि. लातुर हा.मु. शिक्षक कॉलनी जि. धाराशिव हे दि.01.04.2024 रोजी 09.00 वा. सु. महिंद्र कार क्र एमएच 25 एएस 1411 गाडीने बेंबळी उजनी रोडने लातुर येथे कर्यक्रमासाठी जात होते . दरम्यान धुत्ता शिवारात आल्यानंतर गाडीचा चालक आरोपी नामे- पंढरी विश्वनाथ येलगट्टे रा. आजनी खुर्द ता. अहमदपुर जि. लातुर यांनी त्याचे ताब्यातील कार हा हायगई व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने तीचा स्टेरिंग रॉड तुटून पल्टी झाल्याने सविता साळुंके या गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या तर अमरसिंह साळुंके विजयकुामर साळुंके, हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अमरसिंह साळुंके यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1)कलालदेव शहाजी पठ, वय 38 वर्षे, रा. गावसुद ता. जि.धाराशिव हे दि.08.04.2024 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटोरिक्षा क्र एमएच 25 ए.के. 1063 ही बसस्थानक समोरील एनएच 65 सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-1)अजित अंकुशराव लोमटे, रा. देवळाली ता. कळंब जि. धाराशिव हे दि.08.04.2024 रोजी 04.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी. 7345 ही कोलेगाव ते शिराढोण रोडवर देवळाली श्विारात राजमाने यांचे आमराई जवळ मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये शिराढोण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
कळंब :आरोपी नामे-1)रामलिंग नानासाहेब नवाडे, वय 40 वर्षे, रा. निवाडा ता. रेणापुर जि. लातुर हे दि.08.04.2024 रोजी 13.10 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.