• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रस्त्यावर वाहने लावण्याच्या वादातून बेंबळीत कुटुंबाला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
135
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : घरासमोरील रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १२) रात्री उशिरा बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर माणिक भोजणे (वय ४४, रा. बेंबळी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी लहु दाणे आणि गणेश खंडु दाणे (दोघे रा. बेंबळी) यांनी भोजणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर आपली चारचाकी आणि मोटारसायकल लावली होती. याच कारणावरून आरोपींनी सुधाकर भोजणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली.

हा प्रकार पाहून सुधाकर यांची पत्नी आणि मुलगा त्यांना वाचवण्यासाठी व भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. मात्र, संतापलेल्या आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर, ‘तुम्ही या गल्लीत कसे राहता तेच बघतो,’ अशी गंभीर धमकीही आरोपींनी या कुटुंबाला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीनंतर सुधाकर भोजणे यांनी थेट बेंबळी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लहु दाणे आणि गणेश दाणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Previous Post

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

Next Post

शिंदेंच्या शिवसेनेत ‘अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक’! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून ‘बरखास्त’चे आदेश?

Next Post
शिंदेंच्या शिवसेनेत ‘अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक’! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून ‘बरखास्त’चे आदेश?

शिंदेंच्या शिवसेनेत 'अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक'! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून 'बरखास्त'चे आदेश?

ताज्या बातम्या

तुळजापुरात १५६ कोटींचा रस्ते घोटाळा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप, कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे वापरल्याचा दावा

तुळजापुरात १५६ कोटींचा रस्ते घोटाळा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप, कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे वापरल्याचा दावा

April 13, 2026
शिंदेंच्या शिवसेनेत ‘अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक’! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून ‘बरखास्त’चे आदेश?

शिंदेंच्या शिवसेनेत ‘अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक’! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून ‘बरखास्त’चे आदेश?

April 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

रस्त्यावर वाहने लावण्याच्या वादातून बेंबळीत कुटुंबाला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

April 13, 2026
 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

April 13, 2026
‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

April 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group