• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शासकीय जागेवर के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा

जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श शिक्षण प्रसारक मंडळास 'कारणे दाखवा' नोटीस / २४ तासात खुलासा करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई

admin by admin
November 30, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
शासकीय जागेवर के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शासकीय जागेवर गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा उभा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास आज ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. कोणाच्या परवानगीने पुतळा केला ? याचा खुलासा येत्या २४ तासात करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थांसाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूलविरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने दिले होते.

शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे.त्यामुळे अनधिकृत तसेच अतिक्रमित इमारत पाडून पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या अर्जाची सत्य पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास आज कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोणाच्या परवानगीने पुतळा केला ? याचा खुलासा येत्या २४ तासात करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

भोसले हायस्कुलची अनधिकृत इमारत पाडून के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हटवा

काय आहे तक्रार ?

जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेल्या इमारत संदर्भात मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा करण्याबाबत दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी आदर्श शिक्षण मंडळास आदेशित केलेले आहे.

तथापि मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या उक्त आदेशानुसार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने अध्याप पावेतो अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा केलेला नाही. कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा करण्याकरिता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९ दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीनुसार जिल्हा प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा प्रशासनाच्या विना अनुमती कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा केला असल्याने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हेतुपुरस्सर भंग केला आहे.तेव्हा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेली इमारत व कै. के.टी. पाटील यांचा उभा केलेला अनाधिकृत पुर्णाकृती पुतळा तात्काळ हटविण्यात यावा.

 

Previous Post

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक पद तीन महिन्यापासून रिक्त

Next Post

पोलीस कस्टडीतील लेखापाल सुरज बोर्डे यांची नगर पालिकेत कसून चौकशी

Next Post
पोलीस कस्टडीतील लेखापाल सुरज बोर्डे यांची नगर पालिकेत कसून चौकशी

पोलीस कस्टडीतील लेखापाल सुरज बोर्डे यांची नगर पालिकेत कसून चौकशी

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group