धाराशिव : धाराशिव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना हाताशी धरून मागील काही दिवसापासून रेशनच्या तांदळाचा काळा बाजार सुरु आहे. यात काही दलाल पत्रकार गुंतले आहेत. ग्रामीण पोलिसांनी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात असलेला १४६ पोते तांदूळ जप्त करून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु मुख्य म्होरक्या असलेल्या दलाल पत्रकारास अभय दिले आहे, त्यामुळे उलट – सुलट चर्चा सुरु आहे.
आरोपी नामे-1) सतिश शितोळे, रा. रामनगर धाराशिव, 2) इम्रान सलाउद्दीन शेख, वय 34 वर्षे रा. समर्थनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.02.2024 रोजी 11.00 वा. सु. वरुडा रोडवरील शिंदे कॉलेजच्या पुढे विटभट्टीजवळ महारष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तांदुळ साठवून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी छोटा हत्ती क्र एमएच 25 पी 1723 व पिकअप क्र एमएच 14 जीडी 2901 वाहनमध्ये अंदाजे 1,75,200 ₹ किंमतीचे 146 तांदळाचे पोते, रिकामे सुतळीचे 49 पोते असा एकुण 11,75,935 ₹ किंमतीचा माल घेवून जात असताना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी नमुद माल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम कायदा कलम- 3, 7 अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे
पोलिसांनी इम्रान सलाउद्दीन शेख यास अटक केली, परंतु सतिश शितोळे यास अद्याप अटक केलेली नाही. त्याचा अटकपूर्व जामीन व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी शितोळे यास अटक करून, पोलिसी खाक्या दाखवल्यास दलाल पत्रकाराचे नाव उघड होणार आहे. या दलाल पत्रकाराने काळे धंदे करून, लाखो रुपयाची माया जमविली आहे.
वाहनावर लिहिले ” आपलेच गद्दार “
काळ्या बाजारात तांदूळ वाहतूक करणाऱ्या पिकअप क्र एम एच 14 जीडी 2901 या वाहनावर ” आपलेच गद्दार ” असे लिहिण्यात आले आहे. हे वाचून पोलीस आणि नागरिकांना हसू येत आहे. शासनाशी आणि लोकांशी गद्दारी करणारा ‘आपलेच गद्दार ” म्हणतो, हे वाचून लोकांना संताप येत आहे.