धाराशिव: शहराच्या डीआयसी रोडवरील माणिक चौकाजवळ बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये बोलेरो आणि कारची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धाराशिव येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमी:
- स्नेहा सोमा खेडे (वय २५)
- जयेश अरुण खेडे (वय १४)
- वैशाली अरुण खेडे (वय ३०)
हे तिन्ही जखमी केळेवाडी (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री माणिक चौकाजवळ बोलेरो आणि कारची जोरदार धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आणि पुढील तपासाला सुरुवात केली आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.