धाराशिव – धाराशिव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शंकर विश्वनाथ महाजन (वर्ग -2) यांना लाच प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष खटला क्र. 18/2015 मध्ये श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय दिला आहे.
धाराशिव ते गडदेवधरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बिलाचे मोजमाप पुस्तीकेवर सहया करण्यासाठी अभियंता महाजन यांनी 12,000/- रुपये लाच मागितली होती. तडजोडीनंतर त्यांनी पंचासमक्ष 10,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली होती.
न्यायालयाने शंकर महाजन यांना कलम 7 अन्वये 04 वर्षे कारावास व 50,000/- रुपये दंड, आणि कलम 13(1)(ड) व 13(2) अन्वये 07 वर्षे कारावास व 50,000/- रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 03 महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी तपास केला होता. सरकारी वकील पी.के. जाधव यांनी खटल्यात सरकारची बाजू मांडली. आरोपीची बाजू ऍड . पी. एम. नळेगावकर यांनी मांडली . पैरवी अधिकारी पो. नि. नानासाहेब कदम आणि कर्मचारी पो. ह/1043 ए. एस. मारकड आणि पो.शी/960 जे. ए. काझी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.