धाराशिव – जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात गोवंश तस्करी प्रकरण उघडकीस आले असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच, निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असलेल्या दोन बैलांसह वाहन जप्त करण्यात आले आहे.
दिनांक २३ मार्च २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता, लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने पाटोदा ते लोहारा मार्गावरील आश्रम शाळा मार्डीजवळ छोटा हत्ती वाहन (क्रमांक MH 42 M 6412) थांबवून तपासणी केली. वाहनात निर्दयतेने कत्तलीसाठी गोवंशीय जातीचे दोन बैल आढळून आले. या बैलांची एकूण किंमत अंदाजे ९०,००० रुपये आहे, तर वाहनासह एकूण मालमत्ता २,४०,००० रुपये जप्त करण्यात आली आहे.
आरोपीची ओळख:
१) सय्यद अंजीर जानुमिया (वय ३० वर्षे, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव)
आरोपीने बैलांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे आढळून आले. यावरून आरोपीविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत कलम ११(१), ११(डी), ११(१)(ई), ११(१)(एच) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.