धाराशिव : मी सीबीआय पोलीस आहे, अशी बतावणी करुन विश्व ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक प्रकाश परंडेकर यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून पोबारा करणाऱ्या एका भामट्याविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-प्रकाश श्रीनिवासराव परंडेकर ( वय 70 वर्षे, रा. समता कॉलनी, 11 नंबर शाळेसमोर धाराशिव ) हे दि. 29.06.2024 रोजी 13.30 वा. सु. त्यांचे घराचे गेटजवळ आले असता एका अनोळखी इसमाने मी सीबीआय पोलीस आहे, अशी बतावणी करुन फिर्यादीच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या एकुण 50,000 ₹ किंमतीच्या काढून घेवून फसवणुक करुन तेथून निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रकाश पंरडेकर यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे तीन गुन्हे
तुळजापूर : आरोपी नामे-नेताजी चंदु शिंदे, जगन्नाथ चंदु शिंदे, रा. कसई पाटी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 27.06.2024 रोजी 12.00 वा. सु. कसई पाटी तुळजापूर येथे फिर्यादी नामे- पंप्या दामू शिंदे, वय 26 वर्षे, रा. मानमोडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पंप्या शिंदे यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे-अज्जु वाहब सय्यद, रिजवान पाशा शेख, नवाज, मौला सय्यद, एक अनोळखी इसम सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 28.06.2024 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरील तुळजापभवानी हॉटेल येथे व कारखान्यावरील पेट्रोलपंपावर फिर्यादी नामे- संतोष हानुमंत भोसले, वय 42 वर्षे, रा. वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना विहीरीवरील मोटार व मोटारीचे वायर चोरुन नेले ते परत द्या असे म्हणालेचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी जवळील 35,000₹ रोख रक्कम काढून नेली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष भोसले यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 147, 148, 149, 327, 324, 323, 504, 506, सह अ.जा.अ.ज.प्र.कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-अविनाश पोपट सावंत, श्रीमंत वामन सावंत, राजेंद्र श्रीमंत सावंत, विजय श्रीमंत सावंत, हनुमंत वामन सावंत, नरसिंग हनुमंत सावंत, सोमनाथ हनुमंत सावंत, हिराबाई पोपट सावंत सर्व रा. जागजी ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.06.2024 रोजी 14.00 वा. सु. जागजी शिवारातील शेत गट नं 872 मधील शेतात फिर्यादी नामे- बळीराम लक्ष्मण सावंत, वय 54 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातुन येणारे पावसाचे पाणी का बंद केले नाही या करणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, कोयता, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम सावंत यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.