• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

एका आरोपीची निर्दोष मुक्तता

admin by admin
October 26, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी आणि ३२ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली तसेच एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे यांनी दिला.

तुळजापूर तालुक्यात गाजलेल्या या प्रकरणाची माहिती अशी की, २७ जानेवारी २०२१ रोजी एका गावातील एक अल्पवयीन मुलगी मैत्रिणीकडे वही देण्यासाठी गेली असता, एका तरुणाने फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके, मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे आणि आनंद शिवाजी घोडके या तीन जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३७६, ३४१, ३४२ , ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या कलम ४,६,८,१६,१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शहा व एस.बी. मोटे यांनी केला होता.

या प्रकरणात आनंद शिवाजी घोडके याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आले होते आणि सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके व मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे यांच्याविरुद्ध दोषारोप सादर केले होते.

सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगताप यांच्यासमोर झाली , सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आर. एस. म्हेत्रे यांनी कामकाज पहिले. सदर प्रकरणात पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

सदर प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे यांच्यासमोर झाला. सदर प्रकरणात आलेला ठोस पुरावा आणि पीडितीही सुसंगत साक्ष व विशेष अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके यास २० वर्षे सक्तमजुरी आणि ३२ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हे प्रकरण घडल्यानंतर पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून त्या गावात  मोर्चा काढण्यात आला होता तसेच धाराशिव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी पीडित मुलीची भेट घेऊन , आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे तुळजापूर तालुक्याचे लक्ष वेधले होते.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

शेतकऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारी !

Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारी !

शेतकऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारी !

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026
‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

September 24, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

“एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार

September 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी

September 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली

September 24, 2026

Recent Posts

  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
  • ‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!
  • “एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार
  • लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी
  • कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!