धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. एकूण ६६ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६१.८६ % मतदानाची नोंद झाली.
मतदारसंघनिहाय मतदानाचे प्रमाण
– धाराशिव मतदारसंघ: ६३ .७५ %
– परंडा मतदारसंघ: ५७.७०%
– तुळजापूर मतदारसंघ: ६६.८९ % (सर्वाधिक मतदान)
– उमरगा (राखीव) मतदारसंघ: ५७.८८%
प्रमुख उमेदवारांचे मतदान
धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांनी सारोळा (ता. धाराशिव) येथे, तर महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कळंब शहरात मतदान केले.
तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर (ता. धाराशिव) येथे तर महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांनी तुळजापूर शहरात आपला मतदानाचा हक्क बजावला.
परंडा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. तानाजी सावंत यांनी मुगाव (ता. परंडा) येथे मतदान केले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी गिरवली (ता. भूम) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
उमरगा (राखीव) मतदारसंघात महायुतीचे आ. ज्ञानराज चौगुले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी उमरगा शहरात मतदान केले.
तुळजापूरत सर्वाधिक मतदानाची नोंद
तुळजापूर मतदारसंघात ६६.८९ % मतदान झाले असून, हे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान ठरले आहे. दरम्यान, मतमोजणीचा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी घोषित होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.