तामलवाडी : फिर्यादी नामे-अरविंद ज्ञानदेव ढगे, वय 47 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे अज्ञात व्यक्तीने कुलूप दि.16.02.2024 रोजी 21.00 ते दि. 17.02. 2024 रोजी 04.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 63,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरविंद ढगे यांनी दि.17.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : दि.15.02.2024 रोजी मध्यरात्री ते दि.16.02.2024 रोजी 10.00 वा. सु. येडशी डी पी येथील गवळी पोलपासुन ते कृष्णा बिभीषन वडगणे यांचे शेतातील एल टी पोलवरील 1260 मिटर विद्युत तारा अंदाजे 35,000 ₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वंभर तुकाराम परीट, वय 58 वर्षे, व्यवसाय-नोकरी लाईनमन सब स्टेशन येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे बस्वेश्वर बाबुराव लामदाडे, वय 31 वर्षे, व्यवसाय नोकरी आयसीआयसीआय बॅक कनिष्ठ अधिकारी रा. शंकरवाडी पोस्ट चापोली ता. चाकुर जि. लातुर ह.मु. डिग्गी रोड दिग्वीजय गॅस एजन्सी जवळ उमरगा यांची अंदाजे 70,000₹ किंमतीची होंन्डा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 24 बीटी 8293 ही दि. 15.02.2024 रोजी 22.30 ते दि. 16.02.2024 रोजी 06.00 वा. सु. डिग्गी रोड दिग्वीजय गॅस एजन्सी जवळ उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बस्वेश्वर लामदाडे यांनी दि.17.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.