धाराशिव – गायी आणि कालवड निर्दयतेने वाहतूक करताना बेंबळी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींनी जनावरांना कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केल्याचे उघड झाले आहे.
बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने करजखेडा शिवारातील एनएच ३६१ वरील गोगावपाटी येथे एक पिकअप वाहन (क्रमांक MH 25 P 6027) थांबवले. तपासणी दरम्यान, त्यात गोवंशीय जातीच्या ३ गायी आणि १ कालवड निर्दयतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या जनावरांची एकूण किंमत ६४,००० रुपये असून, वाहनासह एकूण ३,६४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी आदिल आलीम कुरेशी (वय २२), सोफीयान तजुम्मल कुरेशी (वय १९) आणि शाहरुख कुरेशी (सर्व रा. खिरणीमाळा, धाराशिव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम ११(१)(घ)(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.