धाराशिवात पत्रकारांचा लोंढा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी जमा झाला. कारण होतं – पत्रकार परिषदेत मिळालेल्या ‘नागवे धमकी’चा विरोध! पण यावेळी नवा ट्विस्ट तयार होता…
“निवेदन नको, फोटो हवाय!”
नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकारांचं निवेदन स्वीकारायला सरळ नकार दिला!
कारण? “निवेदन घेतलं म्हणजे फोटो येतो… आणि फोटो आला की मेसेज जातो… आणि मेसेज गेला की सोशल मीडिया पेटतो!”
साहेबांचा हिशेब अगदी “निवेदन = फोटो = राजकीय अर्थ”
मग काय झालं?
पत्रकार गोंधळात!
काही पत्रकारांनी नाक पुसलं, काहींनी फोटोसाठी नवा मोबाईल सेट केला… पण साहेब एकदम ‘फोटोप्रूफ’!
“साहेब, दोन सेकंद साठीच…”,
“साहेब, एक पोज तरी!”
“साहेब, हे बघा, हा mic नव्यानं घेतलाय!”
पण पुजार साहेब अगदी USB लॉक सिस्टिमसारखे – “फोटो नो एंट्री!”
आणि जुन्या साहेबांची आठवण…
“आमचे ओंबासे साहेब काय होते! निवेदन घेत, फोटो द्यायचे, इतकंच नाही तर दोन – तीन पत्रकारांना चहा – बिस्किट नाही तर थेट ‘खमंग मिसळ’!”
एक पत्रकार भावुक होतं म्हणाला – “ते दिवस वेगळेच होते…”
तर दुसरा पत्रकार – “त्या मिसळचा टेस्ट अजून जिभेवर आहे!”
शेवटी फोटो कुठे मिळाला?
फोटो न मिळाल्याने “कॅमेरा क्लब” संतप्त झाला!
पण हुशार पत्रकारांनी ‘बायपॅस’ प्लॅन बी लावला –
निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देऊन हसत-हसत एकदम ३६० अँगल फोटो घेतले!
पत्रकार म्हणाले –
“चालायचंच… पुजार साहेबांनी निवेदन नाही घेतलं, पण फोटो काढायची हौस तरी जाधव मॅडमनी पूर्ण केली!”
📸 Moral of the Story:
पत्रकारांचं निवेदन म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इव्हेंट नाही… पण फोटो नसेल तर बातमी कोण वाचणार? 😎
- बोरूबहाद्दर