धाराशिवच्या पत्रकार आंदोलनाचा चौथा अंक म्हणजे “निवेदनगिरीतून सुरू झालेला फोडाफोडीचा डाव!”
सुरुवातीला दिसायला ‘एकी’ वाटणारी ही गँग… आतून मात्र ‘चक्रीवालं राजकारण’ करत होती!
उपस्थिती: आपुलकीपेक्षा अपरिहार्यता!
निवेदन देताना जे पत्रकार दिसले, त्यातले बरेचसे
- मनाने नव्हतेच!
- काहींचं “डोकं तिथं – मन ऑफिसमधल्या पेंडिंग कामात!”
- काही म्हणाले, “हे ड्रग्ज प्रकरण माझं नाही, पण नंतर टार्गेट करू नयेत म्हणून आलो!”
काही मंडळी तर जणू “तो गेला म्हणून आम्हीही आलो…” अशा स्टाईलने आले.
हे आंदोलन नॉर्मल होतंच, पण हजेरी अनैच्छिक होती!
पुजार साहेबांची स्टाईल…
नवीन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हणणं ऐकून घेतलं, पण निवेदन घेतलं नाही,
फोटो तर नाहीच नाही!
त्यामुळे मागील काळातील “ओंबासे कृपा पात्र” मंडळींचा चेहरा लटकला.
मागील काळ म्हणजे ‘स्वर्णयुग’?
- “ओंबासे साहेब किती ऐकायचे हो!”
- “आपली कामं पटापट व्हायची…”
- “साहेबांच्या बंगल्यावर चहा- बिस्कुट, पोहे मिळायचे , कधी कधी बंद पाकीट !”
असं म्हणत काहीजण चहाचा डोंगर पार करत होते.
आणि अचानक “निषेध योजना”!
“इव्हेंट मॅनेजर म्हणाले निषेध करूया, फोटो नाही दिला तर कसं चालेल?”
पण तितक्यात एकाने दुसऱ्याच्या कानात “खरं कारण वेगळं आहे…” असं सांगितलं.
काय?
“ज्याने इव्हेंट केलं त्याला मागील साहेबांनी काम दिलं होतं.
पण पुजार साहेबांनी तेच बिल रोखून ठेवलंय.
त्यात १८% दंडही लावलाय – बोगस काम केल्यामुळे!”
मग काय?
पुजार साहेबांचा निषेध होण्याआधीच निषेध मोहीमेस ब्रेक लागला!
आणि इव्हेंट मॅनेजरचा चेहरा असा पडला, जणू वीज बिल अचानक डबल आलंय!
अखेर काय झालं?
“ओंबासे यांची चमकोगिरी” करणारे ३-४ जण रेस्ट हाऊस मध्ये बसले.
आता ते नव्या साहेबांविरुद्ध “टार्गेट मोहीमेचं” नियोजन करताहेत,
पण प्लॅन काही सुचत नाही!
काहीजण म्हणाले – “तुमचं प्लॅनिंग म्हणजे वाफाळलेली चहाची कप… आतमध्ये काही नाही!”
📜 Moral of the Story:
पत्रकारांनी निवेदन द्यावं, हे ठीक… पण जर ते बोगस बिलाच्या बदल्यात असेल, तर ते पत्रकारिता नव्हे – ती ‘पार्सल डीलिंग’ आहे!
- बोरूबहाद्दर