धाराशिव :आरोपी नामे- 1) सुरज निळकंठ भोसले, 2) हामु बाळासाहेब भोसले, 3)निळकंठ महादेव भोसले सर्व रा. देवळाली ता. जि. धाराशिव इतर पाच अनोळखी इसम यांनी दि. 11.01.2024 रोजी 16.00 वा. सु. देवळाली शिवारात देविदास कोळगे यांचे शेतात फिर्यादी नामे-दिक्षीत पांडुरंग सपकाळ, वय 54 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांना उस मोडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, उसाने मारहाण करुन जखमी केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिक्षीत सपकाळ यांनी दि.14.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (1)(आर), 3(1) )(एस), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-आकाश बन्सी काळे, रा. गायरान पारधी पीडी ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 13.01.2024 रोजी 20.30 वा. सु. गायरान पारधी पीडी ईटकुर येथे फिर्यादी नामे- अजिनाथ छगन शिंदे, वय 40 वर्षे, रा. गोगा पारधी पीडी ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हा फिर्यादी यांचा जावई असुन फिर्यादीचे मुलीस लेकरु होत नसल्याचे कारणावरुन मारहाण करत असताना ते भांडण फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांनी सोडवण्याच्या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादी व फियादीच्या पत्नी मिराबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजिनाथ शिंदे यांनी दि.14.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-युवराज बापुराव सगर, 2) पृथ्वीराज बापुराव सगर, 3) किशोर सादु सगर, 4) धनराज बापुराव सगर सर्व रा. गोरेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.01.2024 रोजी गोरेवाडी येथे जि.प. शाळेच्या समोर फिर्यादी नामे- प्रितम प्रताप नाडे, वय 28 वर्षे, रा. गोरेवाडी ता. जि. धाराशिव यांना लाईटचा पोल रोवण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी फायटर, कातडी बेल्टने माराहण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रितम नाडे यांनी दि.14.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1) प्रितम प्रताप नाडे, 2) शिवाजी लिंबराज मारवाडकर, 3) प्रमोद बाबुराव नाडे, 4) प्रमोद साहेबराव नाडे, 5) संजय विजयकुमार नाडे, 6) विजयकुमार संपत नाडे, 7) सुरज शिवाजी नाडे, 8) सुरज कलृयाण मारवाडकर, 9) संतोष लिंबराज मारवाडकर सर्व रा. गोरेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.01.2024 रोजी गोरेवाडी येथे दुध डेअरीजवळ फिर्यादी नामे- बापुराव नारायण सगर, वय 62 वर्षे, रा. गोरेवाडी ता. जि. धाराशिव यांना विद्युत पोल रोवण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी तांडावर बुक्कीने मारहाण केल्याने फिर्यादीचा दात पडला. तसेच फिर्यादीचा मुलागा हा भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपींनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बापुराव सगर यांनी दि.14.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 325, 324, 323, 504, 506, 143, 147, 149, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.