कळंब :आरोपी नामे- 1)अशोक सुभाष जगताप रा. पिंपळगाव डोळा, 2) बाबुराव शेंडगे, 3) शरद उर्फ पिंटू यादव, 4) शुभम राखुंडे तिघे रा. कळंब, 5) नितीन शंकर काळे रा. तांदुळवाडी यांनी दि. 14.02.2024 रोजी 11.30 वा. सु. मांजरा नदी पुल राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 548 कळंब येथे मराठा आरक्षण संदर्भाने गैरकायद्याची मंडळी जमवून जाणारे येणारे लोक व वाहनास आडवून लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने रोडवर टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-युवराज ज्ञानोबा चेडे, वय 33 वर्ष्ज्ञे, रा. 716 नेमणुक पोलीस ठाणे कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 143, 285, 341 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव –फिर्यादी नामे-फसियेद्दीन अब्दुल गणी शेख, वय 49 वर्षे, व्यवसाय- एसटी महामंडळ, बस चालक-16248 रा. परतुर ता. परतुर जि. जालना हे बस क्र एमएच 14 बीटी 3026 तुळजापूर परतुर ही घेवून जात होते. दरम्यान दि. 14.02.2024 रोजी 13.30 वा. सु. आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर धाराशिव येथे काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरुन येवून अज्ञात तीन इसमांनी एस टी बस ची समोरील काचेवर दगड फेकून फिर्यादी व प्रवाशाला लागेलयाची पर्वा न करता फोडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फसियोद्दीन गणी यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 336, 427 भा.दं.वि.सं. सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अधिनियम 1984 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे-बाबासाहेब महादेव धावारे, वय 46 वर्षे, व्यवसाय- एसटी महामंडळ, बस चालक-2582 रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे बस क्र एमएच 20 जीसी 3480 ही ढोकी मार्गे घेवून धाराशिव कडे येत असताना दि. 14.02.2024 रोजी 16.40 वा. सु. उपळा पाटी ब्श्रिजच्या खाली धाराशिव येथे अनोळखी इसमांनी एस टी बस ची समोरील काचेवर दगड फेकून फिर्यादी व प्रवाशाला लागेलयाची पर्वा न करता फोडून सार्वजनिक संपत्तीचे अंदाजे 20,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाबासाहेब धावारे यांनी दि.14.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 336, 427 भा.दं.वि.सं. सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अधिनियम 1984 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.