शिराढोण : शिराढोण ते कोल्हेगाव रोडवर हासेगाव शिवार येथे बस चालकास गच्छीला धरुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- 1) किशोर जगदीश मुंदडा, 2) अविनाश महाजन दोघे रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.19.12.2023 रोजी 17.00 वा. सु. हासेगाव पाटी येथे शिराढोण ते कोल्हेगाव रोडवर हासेगाव शिवार येथे फिर्यादी नामे-सुभाष श्रीरंग कानडे, वय 46 वर्षे, व्यवसाय- बसचालक, कळंब आगार रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी बस मधील प्रवाशी उतरवण्यासाठी बस थांबवली असता समोर फोरव्हिलर आडवी लावून नमुद आरोपींनी फिर्यादीस तु बस येथे का थांबविली असे म्हणुन गच्छीला धरुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व फिर्यादी हे सरकारी काम करत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुभाष कानडे यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 353, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
मारहाण
येरमाळा :आरोपी नामे- 1)रामानंद बापुराव ढवळे,2) बापूराव ढवळे, दोघे रा. शेलगाव दिवाणी, ता. कळंब जि. धाराशिव, 3) सिरसट व सोबत अनोळखी इसम (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा. सकनेवाडी ता. जि. धाराशिव, यांनी दि.18.12.2023 रोजी 22.00 वा .सु. शेलगाव दिवाणी येथे फिर्यादी नामे- महेश चंद्रकांत शेळके, वय 26 वर्षे, रा. वाणेवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील व भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महेश शेळके यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.