धाराशिव LIVE ने तेरखेडा फटाका स्फोटानंतर फटाका परवाने वाटपातील भ्रष्टाचार, फायर ऑडिटचा फज्जा आणि अनधिकृत कारखान्यांवर सडेतोड बातम्या प्रसिद्ध करताच प्रशासनाची झोप उडाली. पण या गडबडीत अनधिकृत कारखानदार आणि विक्रेते मात्र गेटला कुलूप लावून पसार झाले आहेत!
🚨 फटाका कारखान्यांना अचानक कुलूप, विक्रेत्यांची ‘शटरबंदी’!
📌 धाराशिव LIVE वर बातम्या झळकताच अनधिकृत कारखानदारांनी गेटला कुलूप लावून पलायन केले.
📌 फटाके विकणाऱ्यांनी दुकानावरील पाट्या काढून शटर डाऊन करून धूम ठोकली आहे.
📌 म्हणजेच, हे कारखाने आणि दुकाने पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे!
📌 फायर ऑडिटशिवाय मिळालेले परवाने आणि पैशांच्या जोरावर सुरू असलेला धंदा यामुळेच ही भीती निर्माण झाली आहे.
🔥 याचा अर्थ काय?
✅ धाराशिव LIVE ने उघड केलेला भ्रष्टाचार ‘सत्य’ आहे, म्हणूनच हे कारखानदार गायब होत आहेत.
✅ प्रशासनाने आधीच योग्य कारवाई केली असती, तर आज ही पळापळ झाली नसती.
✅ हे कारखाने आणि दुकाने बेकायदेशीर असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे यांचे अचानक बंद होणे!
⚠️ आता पुढे काय? प्रशासनाला थेट सवाल!
🔹 जे कारखानदार पसार झाले, त्यांना परत आणणार का?
🔹 बंद केलेल्या दुकानांची चौकशी होणार का?
🔹 परवाने वाटपातील भ्रष्टाचार उघड झाल्यावर दोषींवर कारवाई होणार का?
🚨 धाराशिव LIVE चा दबाव कायम – SIT चौकशीशिवाय थांबणार नाही!
📢 संपूर्ण परवाना प्रक्रियेची SIT चौकशी झालीच पाहिजे.
📢 पलायन केलेल्या कारखान्यांची व दुकानदारांची तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
📢 भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून चौकशी झाली पाहिजे.
🔥 धाराशिव LIVE च्या सडेतोड पत्रकारितेचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे.
🔥 पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव LIVE’ वर नजर ठेवा!