नळदुर्ग ते अक्कलकोट या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वाकडे आले आहे. धाराशिव लाईव्हने या रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत वारंवार आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली आणि अखेर या कामाला गती मिळाली.
हा एकूण ३२ किलोमीटरचा रस्ता असून, यातील २१ किलोमीटरचा भाग अक्कलकोट हद्दीत येतो. त्याचे डांबरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र, धाराशिव हद्दीतील ११ किलोमीटरच्या कामात स्थानिक दलालांनी अडथळे निर्माण केल्यामुळे ते रखडले होते.
या रस्त्याचे चौपदरीकरण होणार होते. परंतु, दलालांनी खोटी कारणे दाखवून अडवणूक केल्यामुळे चौपदरीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर जुन्या रस्त्याचे १२ मीटर रुंदीकरण करण्याचे ठरले. त्या कामातही दलालांनी शेतकर्यांच्या नावाने आडकाठी आणली.
दरम्यान, धाराशिव लाईव्हने या रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत सतत पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आणि आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
या रस्त्यामुळे नळदुर्ग आणि अक्कलकोट या दोन्ही शहरांमधील प्रवास जलद होणार आहे. तसेच तुळजापूरहून अक्कलकोटला जाणारा जवळचा मार्ग असल्याने भाविकांना तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.
नळदुर्ग-अक्कलकोट हा रस्ता खूप जुना आहे.
✔ एकूण ३२ किलोमीटर लांबीचा हा रस्ता, त्यातील २१ किलोमीटर अक्कलकोट हद्दीत येतो.
✔ अक्कलकोट हद्दीतील रस्ता डांबरीकरण पूर्ण झाले होते.
✔ मात्र धाराशिव हद्दीतील ११ किलोमीटर रस्ता दलालांच्या आडमुठ्या खेळीमुळे अडकला होता.
✔ धाराशिव लाइव्हच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता हे काम अखेर पूर्णत्वाकडे जात आहे!
“चार पदरी महामार्ग हद्दपार – आता १२ मीटर डांबरीकरण तरी थांबवणार का?”
✔ सुरुवातीला हा रस्ता चार पदरी राष्ट्रीय महामार्ग होणार होता.
✔ पण दलालांनी खोटे आरोप करून काम बंद पाडले, आंदोलने केली, खटले दाखल केले – परिणामी हा महामार्ग रद्द झाला!
✔ तडजोड म्हणून पूर्वीचा जुना रस्ता १२ मीटर रुंदीने डांबरीकरण करण्याचा निर्णय झाला.
✔ मात्र, शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्या टोळीने हेही अडवण्याचा प्रयत्न केला.
✔ धाराशिव लाइव्हने हा प्रश्न उचलून धरला आणि सत्य लोकांसमोर आणले!
“हा रस्ता जनतेसाठी, भाविकांसाठी – दलालांसाठी नाही!”
✔ या रस्त्यावर अनेक गावे आहेत – नागरिकांना अपघात, खराब रस्त्यांमुळे मोठा त्रास होत होता.
✔ तुळजापूरहून अक्कलकोटकडे जाण्यासाठी हा जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे.
✔ आता हा रस्ता पूर्ण झाल्यावर भाविक तुळजाभवानी (तुळजापूर), श्री खंडोबा (नळदुर्ग) आणि श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांचे दर्शन एका प्रवासात सहज घेऊ शकतील.
“धाराशिव लाइव्हचा लढा – रस्ता अडवणाऱ्यांचे बुरखे फाटले!”
📢 विकासविरोधी दलालांना धडा मिळालाय – आता हा रस्ता पूर्ण होणार!
📢 शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्या टोळीला जनता ओळखते – आता लोकच उत्तर देतील!
📢 धाराशिव लाइव्ह जनतेच्या समस्यांसाठी लढत राहील – सत्य समोर आणत राहील!
👉 “रस्ता हा लोकांचा आहे – तो दलालांचा व्यवसाय नाही!”
👉 “काम थांबवण्याचा खेळ संपला – आता भाविकांचा, नागरिकांचा प्रवास सुलभ होणार!”
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
नळदुर्ग – आकलकोट रस्ता चार पदरी झाला असता तर शेतकऱ्यांना गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळाला असता, पण शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्या दलालांनी शेतकऱ्यांना खोटे सांगून त्यांच्याकडून अनेकवेळा पैसे उकळले पण त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले म्हणण्याची वेळ आली आहे.