धाराशिव – शेतीबाजारात सुरक्षेसाठी लाचचा मोर्चा दाखल! धरणी माता साक्षी ठेवून, ‘लोकसेवक’ पदाचा लाजरवाणा गळफास घेत सापळ्यात अडकले. धाराशिव जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपीक दयानंद पांडुरंग चव्हाण यांनी, साधं 50,000 रुपयांचं लहानसं मागणीचं ‘आणि तडजोडीचं’ ऑप्शन देत एका सर्वसामान्य तक्रारदाराला ‘अच्छा! तडजोड करूया’ म्हणून 25,000 रुपयांवर मान खाली घातली.
हे प्रकरण अगदी सिनेमातल्या स्टाईलमध्ये घडलं. चव्हाण साहेबांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षेसाठी मंजुरी मिळवून देण्यासाठी 50,000 रुपये मागितले, पण तक्रारदारांनी ‘तडजोड’ म्हणून या रकमेचं ‘डिस्काउंट’ मागितलं. अखेर 25,000 रुपयांवर व्यवहार ठरला. सापळा अधिकारी नानासाहेब कदम यांच्या चाणाक्ष निरीक्षणाखाली, हा ‘डिस्काउंटेड लाच’ स्वीकारण्याचा कार्यक्रम अचूकपणे पार पडला.
चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच 25,000 रुपयांची नोटांची बंडल पाहिली असेल, आणि त्याच वेळी सापळ्यात आडकले. कायदेशीर सिनेमाचा क्लायमॅक्स सुरू झाला आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा नोंदविण्यात आला.
धाराशिवकरांना आवाहन – चुकून सुद्धा तडजोडीचा विचार करू नका, नाहीतर तुमच्यावर ‘सापळा’ पडू शकतो!
मूळ बातमी
यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दि. 01/10/2024
▶️ युनिट – धाराशिव
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-43 वर्षे.
▶️ आरोपी लोकसेवक –
1) दयानंद पांडुरंग चव्हाण, वय-45 वर्षे,
पद-मुख्य लिपीक, जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव.
रा. ठि. बार्शी रोड, धाराशीव मुळ पत्ता- राजे शिवाजी नगर, पाखर सांगवी, बार्शी रोड, लातुर.*( वर्ग-०३)*
▶️ लाच मागणी रक्कम –
50,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोड अंती 25,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
▶️ लाच स्वीकारली दिनांक –
01/10/2024
▶️ लाच स्विकारली रक्कम – 25,000/- रुपये
▶️ कारण-यातील तक्रारदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सचिव आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळणेकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे सभापती यांचे स्वाक्षरीने जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव येथे अर्ज केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी आदेश देण्याकरीता यातील आलोसे दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 25,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.