धाराशिव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या एका व्यक्तीवर धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी घडली.
आगतराव उर्फ राजेभाऊ शिवाजी खापरे (वय ३५, रा. खापरे गल्ली, बेंबळी, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ४:४० वाजण्याच्या सुमारास खापरे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घालत होते. यामुळे सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण होत होता.
त्यावेळी गस्तीवर असलेल्या धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी, पोलिसांच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून आगतराव खापरे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.