धाराशिव – धाराशिव येथील अमृत नगर येथील राहुल विवेक जाधव यांच्या बहिणीच्या लॅबसाठी लागणारे साहित्य देण्याचे आमिष दाखवून सोलापूर येथील युवराज जेउरकर याने दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जेउरकर याने त्यांच्या बहिणीच्या लॅबसाठी लागणारे मशनरी देतो असे सांगून त्यांच्याकडून फोन पे द्वारे दोन लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही त्याने लॅबचे साहित्य दिले नाही. याप्रकरणी जाधव यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी जेउरकर विरुद्ध भादंवि संकल्प ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज जेउरकर याने १ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ३ मे २०२४ रोजी रात्री ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत UPI ID YUVAJIEUEKAR@YBI या आयडीच्या माध्यमातून जाधव यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, त्यानंतर त्याने लॅबचे साहित्य दिले नाही. याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.