धाराशिव – मराठा समाजाला आरक्षण द्यावे , या मागणीसाठी गेले काही दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असताना, या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. गेल्या दोन दिवसात चार ते पाच बसवर दगडफेक झाली असून, एक बस जाळण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंडा :फिर्यादी नामे- सुनिल निवृत्ती माने, वय 41 वर्षे, व्यवसाय- बस चालक, करमाळा आगार, रा. साडे, ता. करमाळा जि. सोलापूर हे करमाळा येथील बस क्र एमएच 14 बीटी 2153 ही बार्शीकडे घेवून जात असताना दि.30.10.2023 रोजी 12.15 वा. सु. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथे मराठा आरक्षणाचे अनुशंगाने निघालेल्या मोर्चातील एका अज्ञात व्यक्तीने बसचे समोरील काचेवर दगड मारुन बसचे काच फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुनिल माने यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- गणेश शेषेराव जगताप, वय 36 वर्षे, व्यवसाय- बस चालक, निलंगा आगार, रा. बेडगा, ता. निलंगा जि. लातुर हे पुणे ते निलंगा जाणारी बस क्र एमएच 20 बीएल 1941 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 16.30 वा. सु. कोल्हेगाव येथुन जात असताना आरोपी नामे- 1)सचिन बापुराव लंगडे, 2) अविनाश माणिक लगंडे, दोघे रा. ढोकी, ता. जि. धाराशिव 3) आकाश सुधाकर टेकाळे, कोल्हेगाव ता. जि. धाराशिव, 4) नितीन मधुकर शेळके रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवून दगड हातात घेवून बसवर मारत असताना फिर्यादी हे म्हणाले की दगड मारु नका असे म्हणत असताना नमुद आरोपींनी तु गप्प बस अशी दमदाटी करुन बस चालवण्यास अटकाव केला व प्रवाशांच्या व फिर्यादीचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन बसवर दगडफेक करुन समोरील काचेवर दगड मारुन बसचे समोरील काच, हेडलाईट व वायफर फोडून 15,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश जगताप यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 308, 186 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :फिर्यादी नामे- धर्मराज राजेंद्र मोरे, वय 46 वर्षे, व्यवसाय- बस चालक, धाराशिव आगार, रा. सातेफळ, ता. कळंब जि. धाराशिव हे लातुर ते धाराशिव बस क्र एमएच 20 बीएल 1623 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 13.30 वा. सु. पेट्रोलपंप ढोकी बसस्टॉप येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे-1) अविनाश माणिक लंगडे, 2) सचिन बापूराव लंगडे दोघे रा. ढोकी ता. जि. धाराशिव व इतर 2 अनोळखी इसम यांनी दगड हातात घेवून बसवर मरत असताना फिर्यादी हे म्हणाले की दगड मारु नका असे म्हणत असताना नमुद व्यक्तीने तु गप्प बस अशी दमदाटी करुन बसचे समोरील काचेवर दगड मारुन बसचे काच फोडून 10,000₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- धर्मराज मोरे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 186 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे- किरण विशाल शिंदे, वय 39 वर्षे, व्यवसाय- बस चालक, कळंब आगार, रा. बावी, ता. जि. धाराशिव हे बस क्र एमएच 14 बीटी 2029 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 16.15 वा. सु. येडशी बसस्थानक येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे- दत्ता मोहन तुपे, वय 30 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव व इतर अनोळखी इसमांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवून बसचे समोरील काचेवर दगड व आग विजवण्याचे सिलेंडर मारुन बसचे समोरील व बाजूचे काच फोडून 30,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- किरण शिंदे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 427 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुरोरी येथे कर्नाटकची बस पेटवली
उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली. भालकी ते पुण्याला जाणारी बस होती. बस मध्ये 39 प्रवाशी होते. सर्व प्रवाशांना खाली उतरवून बसला आग लावण्यात आली.
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल
वाशी :आरोपी नामे- 1)रंजीत हनुमंत भैरट रा. शेलगाव, 2) महादेव कोंडीबा जाधव, 3) अनिल जगन्नाथ खोसे, 4) नितीन मुरलीधर तळेकर, 5) नितीन विजय तळेकर, 6) विजय देवकराव तळेकर, 7) विनोद रामदास खोसे, 8) मधुकर पन्नुलाल क्षत्रीय, 9) निखील हरीश्चंद्र भैरट, 10) संदेश महादेव जाधव, 11) अविनाश ज्ञानोबा मेटे, 12) नामानंद बाजीराव मेटे, 13) सचिन हनुमंत खोसे, 14) अमोल हनुमंत खोसे, 15) राजाभाउ विश्वनाथ सावंत, 16)अमर रामभाउ खोसे, 17) प्रमोद तुकाराम पाटील, 18) राजाभाउ साहेबराव खोसे, 19) दत्ता कल्याण मेटे, 20) अक्षय सदाशिव गवळी, 21) प्रल्हाद आण्णासाहेब मेटे, 22) शिवाजी वैजीनाथ मुळीक, 23) रोहन आप्पासाहेब सावंत व इतर अनोळखी 50 ते 60 इसम यांनी दि. 30.10.2023 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. विजोरा पाटी येथे एनएच 52 नॅश्नल हायवेवर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 नुसार लागु केलेल्या जमावबंदी व शस्त्रबंदी ओदशाचे उल्लघंन करुन बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर येणारे जाणारे वाहने पुर्वसुचना न देता अडवून वाहनासमोर लोकांचे जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा रितीने टायर व लाकडी ओंडके जाळून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी- दादाराव शिवाजी औसरे, वय 31 वर्षे, पोलीस अंमलदार/144 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 341,188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :आरोपी नामे- 1)रमेश भरत गायकवाड, 2)उमेश भरत गायकवाड, 3) आकाश अंगद मुळे, 4) सचिन भुजंग गायकवाड, 5) राहुल संदीपान गायकवाड, 6) बालाजी हनुमंत गायकवाड, 7) तानाजी हनुमंत गायकवाड, 8) संभाजी आप्पासाहेब गायकवाड, 9) सुंदर आप्पासाहेब पाटील,10) सुंदर दगडू गायकवाड, 11) बाळासाहेब विक्रम खोचरे, 12) महादेव नारायण गायकवाड, 13) अशोक गोरख कदम, 14) अतुल संदिपान गायकवाड, 15) चंद्रकांत जगन्नाथ गायकवाड, 16) विनोद फुलचंद शिकेतोडे,17) नितीन फुलचंद गायकवाड, 18) संजय विक्रम खोचरे, 19) भास्कर आप्पासाहेब गायकवाड, 20) इंदर दगडू गायकवाड, 21) बाळासाहेब अंकुश गायकवाड, 22) तुषार बंडू गायकवाड, 23) महाविर सखाराम गायकवाड, 24) कैलास विनायक गायकवाड, 25) संतोष विनायक गायकवाड, 26) योगेश लक्ष्मण गायकवाड 27) प्रदीप नवनाथ गायकवाड व इतर अनोळखी 50 ते 60 इसम यांनी दि. 30.10.2023 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. सरमकुंडी पाटी येथे एनएच 52 नॅश्नल हायवेवर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 नुसार लागु केलेल्या जमावबंदी व शस्त्रबंदी ओदशाचे उल्लघंन करुन बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर येणारे जाणारे वाहने पुर्वसुचना न देता अडवून वाहनासमोर लोकांचे जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा रितीने टायर व लाकडी ओंडके जाळून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी- रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस अंमलदार/1514 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 341, 188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.